भक्तनिवास

संकल्पना

भक्तनिवास याचा शब्दश: अर्थ म्हणजे भक्ताची राहण्याची जागा. येथे मात्र “केवळ देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताची अन्यत्र कुठेही राहण्याची सोय न झाल्याने त्याला तात्पुरते राहण्याचे ठिकाण” असा याचा संकुचित अर्थ नाही.
लौकिकार्थाने “भक्तनिवास” या संज्ञेची व्याप्ती फार मोठी आहे. भाविकांच्या मनात आपल्या आराध्याविषयी अपरिमित श्रद्धा असते. त्याच्या दर्शनाची, कृपादृष्टीची आस असते. जे भक्त, उपासक देवस्थानच्या जवळच्या परिसरात राहतात त्यांना देवाचे नित्यदर्शन घेण्याचे भाग्य लाभते. जे भक्त भौगोलिकदृष्ट्या दूर आहेत ते जसे शक्य होते तसे देवदर्शनास येतात. श्री नारायणाची यथाशक्ती पूजाअर्चा, सेवा करतात.
देवाचे निवास असलेले मंदिर हे भक्तांसाठी अपरिमित शांतीचे महाद्वार असते. या शांतीचा अनुभव घ्यावा, देवाच्या सान्निध्याचा लाभ घ्यावा, दैनंदिन धकाधकीतून दोन घटका - चार दिवस वेळ काढून आपल्या कुलदेवतेच्या पायाशी रुजू व्हावे अशी इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात रुंजी घालत असते.


भक्तनिवास १ व २

श्री नारायणाच्या भाविकांना त्यांच्या आराध्यासोबत, तात्पुरता का होईना, काही काळ व्यतीत करण्याची संधी मिळावी, त्यांची देवळाच्या जवळपास राहण्याची सोय व्हावी याकरिता श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टतर्फे सन २००३ ते सन २००८ या काळात “भक्तनिवास क्रमांक १ व २” बांधण्यात आले.
ट्रस्टचे अथक प्रयत्न आणि त्याला श्री नारायणावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या उपासकांनी देणग्यांच्या स्वरूपात दिलेली साथ यामुळे आज देवस्थानाजवळच भक्तनिवासाच्या दोन वास्तू उभ्या आहेत.


त्यांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे :

वास्तूंची नावे रचना प्रत्येक सदनिकेमध्ये एकूण व्यक्ती सुविधा
भक्तनिवास १

४ सदनिका
१ सदनिका स्वतंत्र न्हाणीघर व शौचालयासहित
३ सदनिका सामायिक व शौचालयासहित
१ सामायिक बैठकीची खोली.

२ व्यक्ती
( गरजेनुसार १ जास्त)

बेड, चादरी, उश्या, पुरेसा पाणीपुरवठा, आंघोळीसाठी गरम पाणी

भक्तनिवास २

४ सदनिका
१ सदनिका स्वतंत्र न्हाणीघर व शौचालयासहित
३ सदनिका सामायिक व शौचालयासहित
१ सामायिक बैठकीची खोली.

२ व्यक्ती
( गरजेनुसार १ जास्त)

बेड, चादरी, उश्या, पुरेसा पाणीपुरवठा, आंघोळीसाठी गरम पाणी


आवाहन

भक्तनिवासाकरिता ट्रस्टद्वारे कोणतेही नोंदणीशुल्क किंवा भाडे आकारणी निश्चित केलेली नाही. भक्त स्वेच्छेने नोंदणीशुल्क / भाडे / देणगी देतात त्यास आशीर्वादस्वरूप मानून भक्तनिवासाच्या देखभालीचे व सुधारणेचे कार्य चालू आहे.
श्री लक्ष्मीनारायणास आराध्य दैवत मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या दानशूर भक्तांनी ट्रस्टच्या या सेवाकार्यास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, ही विनंती.


भक्तनिवास सदनिका आरक्षण / देणगी

Offline

  1. सदनिका आरक्षण अर्ज / देणगी अर्ज साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  2. अर्जातील सर्व तपशील भरणे बंधनकारक आहे.
  3. शुल्क भरल्यानंतर त्या व्यवहाराचा संदर्भ क्रमांक किंवा स्क्रीनशॉट काढून तो अर्जासोबत attach करावा.
  4. अर्जासोबत अर्जदाराचे ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे.
  5. शुल्क भरण्याकरिता माहिती पुढीलप्रमाणे:
  6. For Bank Transfer/NEFT/RTGS:

    Name : Shree Lakshminarayan Trust, Walaval
    Bank : State Bank of India
    Branch : walaval Bazarpeth
    Account No.: 11518331762
    IFSC Code : SBIN0004683
    For Cheque/ DD : “Shree Lakshminarayan Trust, Walaval”
    For Cash : Contact Shri Vijay Shripad Walvalkar (९१- ९८६९२७१४१६)

भक्तनिवास आरक्षण अर्ज


अधिक माहितीसाठी संपर्क : श्री कल्पेश वालावलकर (व्यवस्थापक) 9404751371, 9403298708

भक्तांच्या केवळ माहितीसाठी : सध्याची भक्तनिवास १ ची वास्तू एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेस भाडेतत्त्वावर देण्याची ट्रस्टची योजना आहे. ट्रस्टसाठी नियमित स्वरूपाचे उत्पन्न सुरु असावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्यास, भक्तनिवास २ या वास्तूवर अतिरिक्त मजला बांधण्यात येईल.

ट्रस्टविषयी

‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.

वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

महत्वाचे पृष्ठ दुवे


सूचना

सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.

आमचा पत्ता:

श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल
भक्तनिवास २, मु. पो. वालावल,
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ४१६५२८
श्री कल्पेश वालावलकर (भक्तनिवास व्यवस्थापक) 91 - 9404751371, 9403298708

मुंबई पत्ता:

हरिनिवास बिल्डींग, टेंभीनाका,
धोबीआळी, ठाणे (पश्चिम) ४००६०१.
श्री. विजय श्रीपाद वालावलकर (विश्वस्त)९१ - ९८६९२७१४१६