ट्रस्ट ने हाती घेतलेली सेवाकार्ये कधी स्वखर्चाने तर कधी दानशूर भक्तगणांनी दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे पूर्ण होतात.

कधी कधी भक्ताला श्री लक्ष्मीनारायणाचे चरणी सेवा देण्याची तीव्र इच्छा असते. मात्र भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याकारणे तो दरवेळी प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही.

या सर्व भक्तांच्या सोयीसाठी श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टने आता ई सेवा (ONLINE PAYMENT) सुविधा उपलब्ध केली आहे.


भक्तगण सदर ई-सेवा सुविधाचा वापर पुढीलपैकी कोणत्याही कारणासाठी करू शकतात.

1. देणगी

  1. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट सर्वसाधारण देणगी
  2. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टने हाती घेतलेल्या देवस्थान देखभाल, दुरुस्ती आणि सुधारणाकरिता देणगी
  3. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या अन्य विकासकार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी देणगीी
  4. भक्तनिवासाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी देणगी

भक्तनिवासाकरिता ट्रस्टद्वारे कोणतेही नोंदणीशुल्क किंवा भाडे आकारणी निश्चित केलेली नाही. भक्त स्वेच्छेने नोंदणीशुल्क / भाडे / देणगी देतात. त्यास आशीर्वादस्वरूप मानून भक्तनिवासाच्या देखभालीचे व सुधारणेचे कार्य चालू आहे.

श्री लक्ष्मीनारायणास आराध्य दैवत मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या दानशूर भक्तांनी ट्रस्टच्या या सेवाकार्यास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, ही विनंती.

सूचना : देणगीसाठी ऑनलाईन पेमेंट करताना भाविकांनी वरीलपैकी संबंधित कारण नमूद करणे आवश्यक आहे.


2. भक्तनिवास आरक्षण

दूर अंतरावरून मंदिरात येणाऱ्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांना स्वत:चे वास्तव्यस्थान जवळ नसल्यास, त्यांची निवासाची तसेच भोजनादि तात्पुरती सोय व्हावी याकरिता श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टतर्फे सन २००३ ते सन २००८ या काळात “भक्तनिवास क्रमांक १ व २” बांधण्यात आले.

ट्रस्टचे अथक प्रयत्न आणि भक्तगणांनी देणग्यांच्या स्वरूपात दिलेली साथ यामुळे आज देवस्थानाजवळच भक्तनिवासाच्या या दोन वास्तू उभ्या आहेत.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा https://slntrust.org/Bhaktanivas.html

भक्तांना विनंती आहे की निवासाची / जेवणाची उपलब्धता भक्तनिवास व्यवस्थापकाशी संपर्क साधून येण्याअगोदरच जाणून घ्यावी; त्यानंतरच आरक्षण करावे.

भक्तनिवास व्यवस्थापक: श्री कल्पेश वालावलकर 9404751371 / 9403298708


3. सभासदत्व

“श्री देव लक्ष्मीनारायण” आपले सर्वांचे आराध्य आहेत.

श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट आपल्या निश्चित धोरणानुसार श्री लक्ष्मीनारायण मंदिर व परिसराची देखभाल, दुरुस्ती आणि सुधारणा याकरिता कायम कटिबद्ध आहे.

अनेक भक्तांनी वेळोवेळी ट्रस्टच्या सेवकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यांच्या विनंतीचा मान राखून या सेवाकार्यात श्री लक्ष्मीनारायणाच्या उपासकांना मोठ्या संख्येने सामील करून घेण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे.

आजीवन सभासदत्व शुल्क रु 1001/- फक्त


For Bank Transfer/NEFT/RTGS/IMPS:

Name : Shree Lakshminarayan Trust, Walaval
Bank : State Bank of India
Branch : walaval Bazarpeth
Account No.: 11518331762
IFSC Code : SBIN0004683
For Cheque/ DD : “Shree Lakshminarayan Trust, Walaval”
UPI ID :SHRILAXMINARAYANTRUSTWALAWAL762@SBI
For QR Scan :

मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करावयाचे असल्यास असे करावे -

  1. QR कोड काही सेकंदासाठी दाबावे.
  2. "Download Image" पर्याय निवडावा.
  3. QR कोड मोबाईलच्या गॅलरीमध्ये जतन होईल.
  4. यानंतर पेमेंट ऍपमध्ये जावे.
  5. "Scan QR Code" पर्याय निवडावा.
  6. "Upload from Gallary" पर्याय निवडावा.
  7. QR कोडवर क्लिक करावे.

विशेष सूचना:

  1. ई सेवाद्वारे NEFT / RTGS / IMPS तसेच GPay / Paytm / BHIM / PhonePe अथवा अन्य कोणत्याही UPI पेमेंट पद्धतीने ट्रस्टला आर्थिक मदत करता येईल.
  2. या सुविधेचा लाभ घेताना अगोदर पेमेंट करावे, नंतर संबंधित अर्ज भरावा.
  3. त्या अर्जात अपेक्षित माहिती पूर्ण व अचूक भरावी.
  4. अर्जासोबत पेमेंटचा स्क्रीनशॉट जोडावा. तसेच अधिकृत ओळखपत्राची प्रत जोडावी.
  5. चेक अथवा रोख रक्कम दिली असल्यास ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा तपशील नमूद करावा.
  6. ट्रस्ट पेमेंट गेट-वे सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल.
  7. काही तांत्रिक कारणांमुळे सदर देणगी भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत कर लाभ मिळण्यास पात्र नाही. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट लवकरच संबंधित प्रक्रिया पूर्ण करून 80G प्रमाणपत्र प्राप्त करेल, व तशी सूचना संकेतस्थळावर देण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी.

देणगी अर्ज

भक्तनिवास आरक्षण अर्ज

सभासदत्व अर्ज

 

ट्रस्टविषयी

‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.

वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

महत्वाचे पृष्ठ दुवे


सूचना

सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.

आमचा पत्ता:

श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल
भक्तनिवास २, मु. पो. वालावल,
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ४१६५२८
श्री कल्पेश वालावलकर (भक्तनिवास व्यवस्थापक) 91 - 9404751371, 9403298708

मुंबई पत्ता:

हरिनिवास बिल्डींग, टेंभीनाका,
धोबीआळी, ठाणे (पश्चिम) ४००६०१.
श्री. विजय श्रीपाद वालावलकर (विश्वस्त)९१ - ९८६९२७१४१६