वालावल गाव

श्री क्षेत्र वालावल

वालावल गाव

महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल हे एक पुरातन निसर्गसंपन्न गाव. महाराष्ट्र सरकारने पर्यटनजिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘पर्यटनग्राम’ म्हणून स्थान मिळवू पाहणारे हे गाव. या गावात निसर्गरम्य व ऐतिहासिक अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

प्राकृतिक सृष्टीसौंदर्यातही हा गाव अतिशय लोभसवाणा आहे. अगदी प्रभात स्टुडीओच्या काळापासून अनेक सिने-निर्मात्यांचा आकर्षणबिंदू ठरला आहे. गावाच्या उत्तरेला, हिरव्याशालूला जरीचा पदर असावा तशी, बारामाही तुडुंब भरून वाहणारी कर्लीची खाडी आणि माडांच्या झावळ्यांनी सुशोभित झालेला, उन्हात चमचमणारा, मधल्या बेटाने द्विमुखी झालेला, नौकाविहारासाठी मोह घालणारा तिचा शांत प्रवाह आहे. उरलेल्या तीन दिशांना हिरवी झाडी मन मोहून घेते.

दक्षिणेला गर्द झाडीत समुद्रसपाटीपासून जवळ जवळ हजार फूट उंची लाभेलेल प्रसिद्ध कुपीचे डोंगर दिसतात. त्यांचे उंच उंच सुळके जणू ढगांना स्पर्श करू पाहतात. उंच पाषाणांच्या बुंध्याला असलेल्या गुहांतून वाघाचे कायम वास्तव्य असते. पूर्वी या कुपीच्या डोंगरात मधूनच केव्हातरी झरे उमटत असत, असे म्हणतात. काचकामासाठी उपयोगी असलेली सिलिका या डोंगरात विपुल प्रमाणात सापडते. इतर वनश्रीसोबत महागडी सागाची झाडेदेखील आढळतात.

येथील कुपीच्या डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणावरून साद घातली की प्रतिध्वनीरूपाने उत्तर देणाऱ्याला ऐकू येते. ‘बोलका पत्थर’, ‘शेळकी डेळकी’ नावाच्या दोन जुळया सुळक्यांमुळे निर्माण होणारा हा साद-प्रतिसादाचा खेळ पर्यटकांना खास आकर्षित करतो.

उंच डोंगर, अवघड दरी आणि घळी यामुळे या गावाला एकेकाळी स्वाभाविक किल्ल्याचे स्वरूप लाभले होते व प्राचीन काळापासून राजे राजवाडे आणि राजकारणी पुरुष संकटाच्या वेळी या कठीण डोंगराळ प्रदेशाचा आश्रय घेत असे म्हणतात.


उपरोक्त माहिती संदर्भ:


 

 

रस्तामार्ग : जवळचे शहर – कुडाळ (मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH १७).
कुडाळ वालावल एस. टी. बसेस तास – दोन तासाच्या अंतराने सुटतात. तसेच ऑटोरिक्षाची सोय उपलब्ध.

रेल्वेमार्ग : जवळचे रेल्वेस्थानक – कुडाळ (कोंकण रेल्वे मार्गे ) कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरून पुढे रस्तामार्गे वालावल गावी पोहोचता येते.

विमानतळ : चिपी, परुळे (प्रस्तावित विमानतळ)

ट्रस्टविषयी

‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.

वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

महत्वाचे पृष्ठ दुवे


सूचना

सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.

आमचा पत्ता:

श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल
भक्तनिवास २, मु. पो. वालावल,
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ४१६५२८
श्री कल्पेश वालावलकर (भक्तनिवास व्यवस्थापक) 91 - 9404751371, 9403298708

मुंबई पत्ता:

हरिनिवास बिल्डींग, टेंभीनाका,
धोबीआळी, ठाणे (पश्चिम) ४००६०१.
श्री. विजय श्रीपाद वालावलकर (विश्वस्त)९१ - ९८६९२७१४१६